कोकणातील शेतकऱ्यांना शेती नुकसान भरपाई तातडीने मिळालीच पाहिजे शौकत मुकादम यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.राज्यशासनाने या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे शौकत मुकादम यांनी गेले तीन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला तर काहींचे शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेताना शौकत मुकादम.अश्रूही पुसले.यावर्षी पाऊस भरपूर पडला त्यामुळे शेतीही चांगली पिकली होती.पण ऐन कापणीच्या हंगामात परतीच्या पावसाने होते नव्हते ते सारे धुऊन नेले.शेतातील भात आडवा झाला.
काही ठिकाणी भात रुजून आला.नाचणी व वरीचेही मोठे नुकसान झाले.कोरोनामुळे आधीच शेतकरी हैराण होते. महागाईने कहर केला आहे.जगणे अशक्य झाले आहे असे असतांना आता पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.शौकत मुकादम यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली व आपण राज्य शासनाला सांगून आपणास तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीन असे आश्वस्त केले.अनेक शेतकऱ्यांनी मुकादम यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या.


Comments
Post a Comment