गडहिंग्लज नगरपालिका उपनगराध्यक्षपदी महेश कोरी

 


गडहिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी जनता दलाचे महेश कोरी यांची निवड झाली आहे. त्यांना २० पैकी १५ मते मिळाली. तर विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सावित्री पाटील यांना ५ मते मिळाली.कोरी यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आणि गुलालाची आतषबाजी करीत जल्लोष केला. जनता दलाचे नेते व माजी आमदार श्रीपतराव शिंदे, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शहराध्यक्ष काशीनाथ देवगोंडा,  बाळकृष्ण परीट, रमेश मगदूम यांचेसह जनता दलाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments