ढोक्रवली येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू


भक्षाचा पाठलाग करत विहिरीत पडलेल्या बिबटयाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ढोक्रवली येथे घडली. ढोक्रवली सुतारवाडी येथील मनोहर राजाराम महाडिक यांच्या मालकीच्या विहिरीवर गुरुवारी सकाळी वीज मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्याना बिबटया पाण्यावर तरंगताना दिसला. परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश्री किर, वनसंरक्षक रानबा बंबर्गेकर यानी घटनास्थळी मृत बिबटयाला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर त्याला पिंपळी येथील रोपवाटीकेत आणले. डॉ. एस. जी. नरळे यानी शवविच्छेदन केले.

Comments