राजापूरचे नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफेंनी स्वतः हातात झाडू घेऊन कर्मचारी व पदाधिका-यांसमवेत शहरात राबवली स्वच्छता मोहीम

 


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने राजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली. विशेष म्हणजे अॅड.जमीर खलिफे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहरातील काही भाग स्वच्छ केला. त्याचप्रमाणे राज्य शासनाने दिलेल्या सुचनेप्रमानेप्रमाणे शहरातील सर्व नागरिक, प्रवासी, व्यापारी यांनी मास्कचा वापर बंधनकारक असल्याबाबत तसेच माझे कुटूंब-माझी जबाबदारी या अभियानाची जनजागृती स्पिकरद्वारे जवाहचौक, शिवाजीपथ, गणेशघाट, पे अँड पार्क इत्यादी ठिकाणी करण्यात आली. तसेच मास्कचा वापर न करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

याचवेळी बंदरधक्का येथे नविन सुसज्ज सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले असून नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये उपनगराध्यक्ष संजय ओगले, शिवसेना गटनेते विनय गुरव, आरोग्य सभापती सौ.स्नेहा कुवेसकर, नगरसेवक गोविंद चव्हाण, सौरभ खडपे, अनिल कुडाळी, सुभाष बाकाळकर, हनीफ युसूफ काझी, आसिफ मुजावर, सौ. शुभांगी सोलगावकर, सौ.प्रतिक्षा खडपे, सौ. परवीन बारगीर, लेखाधिकारी किशोर जाधव, नोडल ऑफिसर जितेंद्र जाधव, सौ.अनुष्का जुवेकर, विनायक पवार, दिलीप पवार, दिवाकर खडपे, संदेश जाधव, संदेश राडी आदी उपस्थीत होते.





Comments