मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट जनावरे रस्तावर स्थळ मांडून
मुंबई-गोवा महामार्गावरील मोकाट पाळीव जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. पाळीव जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आधीच अडथळे निर्माण झाले आहेत. या अडथळ्याची शर्यत पार करत वाहनचालक कसेतरी मार्गक्रमण करत आहेत. मात्र, महामार्गावर मधोमध बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे हा मार्ग आणखीनच खडतर होत आहे.

Comments
Post a Comment