माझे कुटूंब-माझी जबाबदारी अभियानातून १४ लाख लोकांचे सर्वेक्षण, त्यातील २९१ लोक कोरोना पॉझिटीव्ह
मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५३ तक्रारी आल्या होत्या. यातील काही तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. तर काही तक्रारीसाठी विशेष बैठक घेण्यात येईल. यापुढे पुन्हा दोन महिन्यानंतर अशाच प्रकारचा जनता दरबार आयोजीत करण्यात येईल. त्यावेळी अधिका-यांना अभिनंदन करण्यासाठी लोकांनी यावे अशा प्रकारे सुयोग्य पद्धतीने तक्रारींचे निवारण करण्यात यावे अशी भूमिका अधिका-यांनी दाखवावी असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी यावेळी केले.
मंगळवारी जनता दरबार पार पडल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेवेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता एन.भडकवाड, रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती बी.एस.कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा गावडे आदी उपस्थीत होते.
रत्नागिरी जिल्ह्यात माझे कुटूंब-माझी जबाबदारी अभियानाचे ९३ टक्के म्हणजेच १४ लाख १४ हजार ४५ एवढ्या लोकांचे सर्वेक्षण झाले यामध्ये २९१ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. या सर्वेक्षणात ३८ डिग्री ताप असलेले लोक, सर्दी, खोकला असलेले २०९१, कोव्हिड संशयित २१७० एवढे लोक आढळून आले. आपला रत्नागिरी जिल्हा रिकव्हरी रेटमध्ये राज्यात पहिला पाच क्रमांकामध्ये आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क, सोशल डीस्टंसिंग हे नियम पाळणे आवश्यक आहे. दिनांक १८ रोजी राज्यातील पहिले प्लाझ्मा थेरपी सेंटर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरु होणार आहे. याचाही लाभ रत्नागिरीकरांना मिळणार असल्याची माहीती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
Comments
Post a Comment