कार्यकर्त्यांनी अमिषाने विचलित न होता पक्षाचे काम करावे भाजपा उपाध्यक्ष सुर्यकांत साळुंखेंच आवाहन
सत्ता येते आणि जाते मात्र पक्ष हा मोठा असतो. सत्तेच्या मोहापायी कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या अमिषाने विचलित न होता काम करावे. सत्ता नव्हे तर पक्ष हिच आपली खरी संपत्ती असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि बंगलोर स्थित उद्योजक सूर्यकांत साळुंखे यांनी दिली.
काल निवे पंचायत समिती गणात भाजपला बसलेल्या हादऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया बंगलोरहून फोनद्वारे बोलताना दिली. आमच्या काहि कार्यकर्त्यांनी कळत न कळत तुम्हाला मदत केली असेल आणि त्यातून तुम्ही हि फोडाफोडी करत असाल तर ते कदापी सहन केले जाणार नाही.असा इशारा देताना विधानसभा निवडणुकीत युतीधर्म न पाळल्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली
सत्तेचा मोह दाखवून काहिना बरोबर घेतले म्हणजे गड फुटला असे कुणीही समजू नये. आमचा तालुक्यातील गड मजबूत आहे. मागीलवेळी आम्ही शांत होतो आता वेळ आली तर आमची ताकद दाखवल्या शिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.
सत्ता आज आहे उद्या जाईल मात्र पक्ष हाच पहिला असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विचलित होवु नये. आत्ताचे सरकार कधी गडगडेल ते समजणार पण नाही. भविष्यात राज्यात एकहाती भाजपच सत्तेवर येणार आहे. जनतेचा कौल तसाच मिळणार आहे त्यामुळे क्षणिक अमिषांच्या मोहाना बळी पडु नका असे आवाहन हि कार्यकर्त्यांना केले. केंद्रात आपली सत्ता आहे. त्या माध्यमातून आणि आपल्या माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड व आ. डावखरे यांच्या माध्यमातून तालुका पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने जोरावर आपली विकासकामे सुरु आहेत. सत्ता नाही म्हणून आपण थांबलेलो नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रथम पक्षाला प्राधान्य द्यावे असे आवाहन करतानाच काचेच्या घरात राहणाऱ्यानी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत असा सुचक इशारा हि साळुंखे यानी बंगलोरहून दिला दिला आहे.
मी गेले ८महिने कोविड च्या काळात बंगलोरला असलेने तालुक्यात येवू शकलो नाही हि खंत व्यक्त करत आता अनलाँक जाहीर झाल्याने लवकरच तालुक्यात येवून कार्यकर्ते शी हितगुज साधून पक्ष वाढीवर भर देणार असल्याचे हि त्यांनी शेवटी सांगितले.

Comments
Post a Comment