राजापूर शहरातील दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार सुरु करण्यात यावा माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर यांची मागणी


कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर राजापूर शहरात भरणारा आठवडा बाजार बंद करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजापूर बाजारपेठेतील काही जीवनावश्यक वस्तू विक्री करणा-या व्यापायांची चांगलीच चांदी झाली. तालुक्यातील अनेक गोरगरिब लोक गुरुवारी भरणा-या आठवडा बाजारात वस्तू खरेदीसाठी येतात. आठवडा बाजारात रास्त दरात वस्तू खरेदी करतात. त्यामुळे सामान्य माणूस काटकसरीने आठवडा बाजारातील वस्तू खरेदी करुन आपले जीवनमान उंचावतो. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन आठवडा बाजार सुरु करण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी राजापूरचे प्रतिष्ठित नागरिक, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर यांनी राजापूर नगर परिषदेकडे केली आहे. याबाबतचे निवेदन श्री. नार्वेकर यांनी सादर केले आहे.

कोव्हिड काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठवडा बाजार बंद होता. या काळात संपुर्ण राजापूर तालुक्यात व शहरात आरोग्य कर्मचा-यांनी खुप चांगले काम केले. व हे सर्व कर्मचारी अभिनंदन करणे गरजेचे आहे. हे सर्व मेहनत घेत असताना तालुक्यातील जनतेने देखील लॉकडाऊन व जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. मात्र या काळात याच सर्वसामान्य जनातेचे हाल देखील झाले. काही ठराविक दुकानदार अव्वाच्या सव्वा वस्तुंवर किंमती आकारत होते. आणि नाईलाजास्तव सर्वसामान्य माणसांना या वस्तू मिळेल त्या किंमतीत खरेदी कराव्या लागत होत्या. मात्र आता तरी राजापूर शहरात आठवडा बाजार सुरु करुन तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जयप्रकाश नार्वेकर यांनी केली आहे.

Comments