नगराध्यक्षांच्या बडतर्फ मागणीवर २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी


चिपळूणच्या नगराध्यक्षांनी केलेल्या १९ विकासकामांवर आक्षेप घेत महाविकास आघाडीने त्यांना बडतर्फ करावे, अशी याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. यावर काल बुधवारी सुनावणी होणार होती, मात्र जिल्हाधिकार्‍यांनी ही सुनावणी पुढे ढकलली असून आता ती दि. २१ ऑक्टोबरला होणार आहे.

 कालच्या सुनावणीच्या वेळी महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, मार्गदर्शक व नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, नुपूर बाचीम, रसिका देवळेकर आदी उपस्थित होते तर मुख्याधिकारी डॉ. वैभव विधातेही या वेळी उपस्थित होते.

Comments