ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिराविरुद्ध गुन्हा दाखल



महिलेला शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्यावरून (सावर्डे, ता. चिपळूण) पोलिस ठाण्यात दिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.सावर्डे पिंपळ मोहल्यात राहणारी आफ्रीन मुजफ्फर शेकासन हिने सावर्डे पोलिस ठाण्यात तिचा दीर नासीर हशमत शेकासन याने कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत अंगावर धावून येत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार दिल्यावरून नासीर शेकासन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Comments