हाथरस घटना : अजब आणि संतापजनक पोलिसांचा दावा
हाथरसमधील पीडितेवर बलात्कार (Hathras gangrape) झालाच नाही, असा अजब आणि संतापजनक दावा पोलिसांनी केला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टचा आधार घेत पोलिसांनी हा अजब दावा केला आहे. त्यामुळे देशात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
गळ्याजवळ झालेली दुखापत आणि त्यामुळे झालेल्या मानसिक आघातामुळे हाथरसच्या पीडितेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तसेच तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये शुक्राणू आढळले नसल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार झाला नाही, असा पोलिसांचा दावा आहे.

Comments
Post a Comment