उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार व जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी घेतली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

 


रत्नागिरी जिल्ह्यातील घरबांधणी व घर परवानगीचे अधिकार ग्रामपंचायत पातळीवरच ठेवण्यात यावेत. तसेच घरकूल योजने मधील ड वर्गातील घरांच्या याद्या केंद्र सरकार कडून तात्काळ मंजूर करुन घेऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. 

यावेळी चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप आदी उपस्थीत होते. 

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकास कामांमध्ये काही अडथळे येतात त्यासाठी काही नियमांमध्ये काही शिथिलता देण्यात यावी. पंचायत समित्यांचे सुशोभिकरण करण्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा. राजापूर व रत्नागिरी पंचायत समितीसाठी विकास कामांसाठी विशेष निधी द्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्यमंत्री सडक योजनांची कामे रखडली आहेत. 

काही कामांच्या निविदा निघालेल्या नाहित. त्या तात्काळ काढण्यात याव्यात. शिक्षकांचे देखील काही प्रश्न आहेत ते देखील तात्काळ सोदविण्यात यावेत अशा प्रमुख मागण्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आल्या.




Comments