राजापूर अर्बन बँकेची शेड्यूल्ड बँकेकडे वाटचाल

 


1921 साली स्थापन झालेली राजापूर अर्बन बँकेची 2020 सालामध्ये शतक पुर्तिकडे पदार्पण होत आहे. राजापूर तालुकाच नव्हे तर जिल्हा व जिल्हा बाहेर देखील कार्यरत असलेली ही बँक आगामी काळात शेड्यूल्ड बँकिंगकडे वाटचाल करेल असे प्रतिपादन राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे. 

राजापूर अर्बन बँकेचे या वर्षी शतकोत्तरी वर्ष म्हणुन साजरे केले जाणार आहे. या शतकोत्तरी महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी जवाहर चौक नजिक असलेल्या मातोश्री सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी, माजी आमदार गणपत कदम, माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष जमीर खलिफे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मनोहर सप्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन, 

राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेकरकुमार अहिरे, माजी अध्यक्ष अनिल ठाकूर, संचालक सौ.अनामिका जाधव, संजय ओगले, हनिफ मुसा काझी, इब्राहीम बलबले, प्रसाद मोहरकर, अॅड.शशिकांत सुतार, अनिल करंगुटकर, राजेंद्र कशे, ज्येष्ठ कॉंग्रेस कार्यकर्ते सदानंद चव्हाण, माजी अध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, लियाकत काझी, शिवसनेचे ज्येष्ठ नेते पांडूरंग उपळकर, राजापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर, दीनानाथ कोळवणकर, कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भाटकर, भाजपा महिला संघटनेच्या सौ.प्रतिक्षा मराठे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर देवरुखकर राविकांत भामत आदी उपस्थित होते. 

यावेळी माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे म्हणाल्या की राजापूर अर्बन बँक, राजापूर नगर वाचनालय व राजापूर नगर परिषद या तिनही सन्स्था तालुकयासाठी महत्त्वाच्या असून या तिनही संस्थांची चर्चा संपुर्ण महाराष्ट्र राज्यात होत असते. 

माजी आमदार गणपत कदम म्हणाले की कोकणाने पश्चिम विभागातील सहकारी संस्थांचे अनुकरण केले आणि इथेही सहकारी बँका, पतसंस्था स्थापन झाल्या. आज पश्चिम विभागातील सहकारी सन्स्था बुडीत आहेत. मात्र राजापूर अर्बन बँक संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत ठरणारी बँक आहे.

अध्यक्ष जयंत अभ्यंकर म्हणाले की शतक महोत्सवी वर्षानिमीत्त आयोजित कार्यक्रम माझ्या कार्यकाळात होत आहे याचा मला अभिमान आहे. आगामी काळात बँकेवर नव तरुणांचे संचालक मंडळ असावे असे मला वाटते. मात्र भविष्यातील आगामी निवडणूकीत सहकार पॅनलचाच विजय होईल असे मत व्यक्त केले.

Comments