रत्नागिरी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचे तात्काळ सर्वेक्षण करुन त्यांच्यावर कारवाई करावी

 


रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोगस डॉक्टरांच्या बाबतीत तात्काळ सर्वेक्षण करुन जर कुणी बोगस डॉक्टर आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सुचना राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शुक्रवारी रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हा दौ-यावर आले होते. 

यावेळी त्यांनी रत्नागिरी उद्यमनगर येथील कोव्हिड केअर सेंटर व जिल्हा शासकीय रुग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कोव्हिडच्या अनुषंगाने आढावा घेतला. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  दत्ता एन.भडकवाड, रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कायकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा गावडे-फुले, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.कमलापूरकर आदी उपस्थीत होते. 

यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर  यांनी जिल्ह्यातील कोव्हिड अनुषंगाने माहीती दिली. यावेळी ते म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यात माझे कुटूंब-माझी जबाबदारी या अभियानाचे काम चांगले असून येत्या पन्धरा दिवसात शंभर टक्के काम पुर्ण होईल अशी माहीती दिली.

Comments