डॉ.आंबेडकर शेती व संशोधन संस्था सांगोला व अँक्शन एड संस्था मुंबईच्या विद्यमाने नवे दानवाड येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके व मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाचे दोन दिवशी कार्यक्रम संपन्न


नवे दानवाड ता. शिरोळ येथे डॉ. आंबेडकर शेती व संशोधन संस्था सांगोला व अँक्शन एड संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महापुराच्या संकटावर  मात करण्यासाठी कशाप्रकारचे बचाव कार्य करावे याबाबत आपत्ती व्यवस्थापन व प्रात्यक्षिके व मार्गदर्शन या दोन दिवशी प्रशिक्षण वर्गाचे कार्यशाळा उत्साहात पार पडले.समाजभूषण हरिचंद्र कांबळे यांनी  सुरुवातीला स्वागत व प्रस्ताविक करून दोन दिवशी प्रशिक्षणाची माहिती दिली व अशाप्रकारचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण हे गावात पहिल्यांदाच होतोय डॉ.आंबेडकर संस्था व अँक्शन एड संस्थेने गाव दत्तक घेऊन आपत्ती काळातील संकटावर कशाप्रकारे मात करावी याची परिपूर्ण माहिती व प्रात्यक्षिके करून एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चांगले सल्ला व मार्गदर्शन या प्रशिक्षणातून द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पूर परिस्थिती मध्ये गावावर येणारे अचानक आपत्ती संकट कशाप्रकारे हाताळावे याबाबत शोध व बचाव कार्य दल, प्राथमिक उपचार दल,निवारा व्यवस्थापन दल,पूर्वसूचना दल इत्यादी दलाची स्थापन कसे करावे व दलाची जबाबदारी जोखीम काय काम असते याबाबतची संपूर्ण माहिती या प्रशिक्षणात देण्यात आले त्याचप्रमाणे महापुरात कोणकोणते साहित्य उपयोगी पडते,त्याचा वापर कसा करावा,आग लागल्यानंतर व पूर परिस्थिती मध्ये बचाव कार्य कसे करावे, दोरीच्या गाठीचे प्रकार त्याचा वापर कसा करावा कसा करावा,याची संपूर्ण माहिती या प्रशिक्षणात प्रात्यक्षिके करून देण्यात आले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ.वंदना हरिचंद्र कांबळे ग्रामपंचायत सदस्य सौ.शोभा परीट सौ.कमल कांबळे प्रशिक्षक म्हणून अँक्शन एड संस्था मुंबईचे सतिष गिरप,राजकिरण चंद्रनारायण,वैशाली म्हस्के तर डॉ  आंबेडकर शेती व संशोधन संस्थेचे प्राजक्ता ढोले,प्रभा यादव आनंदा कांबळे व ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत भाले,अंगणवाडी व आशा सेविका सह १५ युवक-युवती आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभागी घेतले होते  प्रशिक्षणाचे सांगता समारंभ पंचायत समिती शिरोळ चे माजी सभापती मिनाज जमादार यांच्या उपस्थितीत पार पडले. शेवटी सर्वांचे आभार उपसरपंच शहानुर गवंडी यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.



Comments