चिपळूण मध्ये आय पी एल सामन्यावर सुरू आहे सठेबाजी ?
एकीकडे कोरोना तर दुसरीकडे आय पी एल चा मोसमब सुरू आहे आजपर्यंत आपण मोठ्या बिग शहरात आय पी एल वर सठेबाजी चालते हे पहिले आहे पण आता त्याचे लोन चिपळूण शहरात सुद्धा पसरले असल्याची जोरदार चर्चा नाकानाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहे पण खरंच असे काही घडत असेल तर वेळीच लक्ष देणे काळाची गरज बनली आहे कारण महाराष्ट्र मध्ये नावाजलेले चिपळूण शहर हे एक जुगारी अड्डा बनेल यात तिळमात्र शंका नाही
याबाबत सविस्तर वृत्त असे चिपळूण शहरात आय पी एल च्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सठेबाजी चालते अशी चर्चा रंगू लागली आहे शहरातील प्रसिद्ध तीन बुकी हा व्यवसाय चालवतात त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते सामना सुरू होण्यापूर्वी नाणे फेक केली जाते आणि तेथून सठेबाजीला सुरुवात होते आज कोणता संघ नाणे फेक जिकणार आणि कोणता संघ विजेता होणार यावर लाखो रुपये लावले जातात तर प्रत्येक चेंडू व चोकार ,षटकार ,खेळाडू यांच्या लाखो रुपयांचा सठा लावला जात आहे याबद्दल दबक्या आवाजात चिपळूण शहरात चर्चा सुरू आहे
आय पी एल सठेबाजीवर लाखो रुपये कमविले जातात तर त्याचे कनेक्शन मुंबई असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तर सठेबाजीचा हा सारा खेळ मोबाईल व व्हाट्सअपवर उघडपणे खेळला जात आहे तर प्रत्येक दिवशीच्या सामन्याचे कॅट लॉग सुद्धा वेगवेगळे असतात त्यावर सर्व चेंडू, खेळाडू, चोकार,षटकार,रन आउट,हाफ सेंच्युरी, मॅच मध्ये एकूण किती धावसंख्या होणार आणि कोण जिकणार याचे दर ठरलेले असतात त्यानुसार सठेबाजीचा सारा खेळ खेळला जातो याबाबत शहरात चर्चा रंगू लागली असून वेळीच लक्ष दिले गेले नाहीतर नावाजलेले चिपळूण शहर हा जुगारीचा मोठा अड्डा बनू शकते असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत

Comments
Post a Comment