प्रकाश राजाराम साळवी यांना 'कोविड योध्दा' म्हणुन आमदार राजन साळवींच्या हस्ते सन्मान
राजापूर शहरातील राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजापूर हायस्कूल व गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपिक प्रकाश राजाराम साळवी यांना 'कोविड योध्दा' हा पुरस्कार राजापूर-लांजा-साखरपाचे आमदार राजन साळवी यांचे हस्ते देऊन नुकतेच गौरविण्यात आले. पंचायत समिती राजापूर येथील किसान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जि.प.सदस्य आबा आडिवरेकर,
राजापूर पंचायत समितीचे सभापती प्रकाश गुरव, गटविकास अधिकारी सागर पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंखी, विस्तार अधिकारी विनोद सावंग आदि मान्यवर उपस्थित होते.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध विभागातील शासकिय कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची पोलिस मित्र, आरोग्य मित्र,मदतनीस अशा प्रकारची कोविड सेवा करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. अशा प्रकारची सेवा करणाऱ्या तालुक्यातील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पंचायत समिती राजापूर तर्फे कोविड योध्दा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
श्री.साळवी यांना ही 'कोविड योध्दा ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री.साळवी यांना यापूर्वी राजापूर तालुका शिक्षक परिषदेचा 'आदर्श लिपिक ' पुरस्कार प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा सचिव म्हणून देखील ते काम पाहत आहेत. तसेच संघटनेच्या माध्यमातून शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी देखील ते नेहमी प्रयत्न करत असतात. श्री.साळवी यांना हा पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment