विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा दौरा कार्यक्रम



महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार 24 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून सोमेश्वर चिंचखरी ता.जि. रत्नागिरीकडे शासकीय वाहनाने प्रयाण.  सकाळी 9.30 वाजता सोमेश्वर ता. रत्नागिरी येथे आगमन व सोमेश्वर चिंचखरी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी.  सकाळी 10 वाजता निवळी ता. रत्नागिरी येथे आगमन व अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी.  सकाळी 10.30 वाजता निवळी येथून रत्नागिरीकडे शासकीय वाहनाने प्रयाण.  

सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आगमन व जिल्हाधिकारी/कृषि अधिक्षक यांचे समवेत चर्चा (स्थळ:जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).  दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी).  दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे राखीव.  दुपारी 2.00 वाजता रत्नागिरी येथून लांजाकडे शासकीय वाहनाने प्रयाण.  दुपारी 3.00 वाजता लांजा येथे आगमन अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी.  सायंकाळी 4.00 वाजता लांजा जि. रत्नागिरी येथून ओरस, जि. सिंधुदूर्ग कडे प्रयाण. 


Comments