गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी जोपर्यंत मी पदावर आहे तो पर्यंत मोर्चे काढतच राहणार
केंद्रात मोदी सरकारने कृषी आणि कामगार विधेयक आणून गोरगरिबाना मनस्ताप देण्याचे अवलंबिले आहे. भारतातली शेती अदानी, अंबानीच्या हातात द्यायचे मोदी सरकारने ठरवले आहे. या घटनेचा कॉंग्रेस पक्ष देशपातळीवर तिव्र विरोध करित आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात काही ना काही समस्या असून याचा मनस्ताप गोरगरिब जनता, शेतकरी, मजुर यांना भेडसावत आहे. यामुळे जिल्ह्यातील गोरगरिब जनतेवर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जो पर्यंत मी पदावर आहे तो पर्यंत मोर्चे काढताच राहणार. या मोर्चांमध्ये सर्व जनतेचा सहभाग अपेक्षीत आहे असे आवाहन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले यांनी कुरधुंडा येथील आयोजीत कार्यक्रमात केले.
रत्नागिरी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीची प्रमुख कायकर्त्यांची बैठक कुरधुंडा येथे संपन्न झाली. त्यावेळेस शेतकरी विरोधी काळया कायद्या विरोधी सह्याची मोहीम राबवण्यात आली व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले, उपाध्यक्ष अशोकराव जाधव, निरिक्षक बंडु शेठ सावंत, महादेव चव्हाण, तालुकाध्यक्ष दत्ताशेठ परकर, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, जिल्हा सोशल मिडिया प्रमुख कपिल नागवेकर, भरत खेडेकर, राजेश पतयाने, अब्बास आंबेडकर, कैस मालगुंड कर, भाई बेर्डे, बंटी गोताड, मुदस्सर मोडक, बावा मेस्त्री, हनीफ खलीपे, गजानन पिलणकर, वसंत रहाटे, रफिक कापडे, इरफान नेवरेकर, कैस मालगूंडकर, फयाज हाजू, अदिल अलजी, इफ्तिकार नेवरेकर, खालिद अलजी, अयुब अलजी, सुधिर खापरे, इब्राहिम आंबेडकर, इलियाज मापारी, शैबाज धामस्कर, अविनाश खडसडे, नितिकेत खापरे, विजय जाधव, युसूफ अलजी, इस्माईल अलजी, इब्राहिम अलजी, बावा मेस्त्री, इम्तिकाफ अलजी, वाईद फकीर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment