नाना मयेकरांच्या निधनाचे वृत्त समजताच शरद पवार यांचा आमदार शेखर निकम यांना फोन

 


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष नाना मयेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नाना मयेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय, संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना फोन करुन मयेकर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.

यावेळी शरदचंद्र पवार यांनी नाना मयेकर आजारी कसे पडले, त्यांना कुठे कुठे उपचार करण्यात आले याबाबत सविस्तर माहीती घेतली. यावेळी शरदचंद्र पवार फोनद्वारे म्हणाले की आपण रत्नागिरित आल्यावर कै.नाना मयेकर यांचे सांत्वन करु. कै.नाना मयेकर यांच्या कुटुंबियांच्या दु:खात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी आहे असे त्यांनी सांगितले.

Comments