ओम ग्रुप आडिवरे तर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

 


येथील ओम ग्रुप, आडिवरे आणि इन्फिगो आय केयर हॉस्पिटल रत्नागिरी तर्फे आडिवरे आणि कशेळी गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आडिवरे येथील श्री महाकाली इंग्लिश स्कूलच्या गजानन सभागृहात रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२० रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी १० वाजता दिपप्रज्ज्वलन आणि सरस्वती प्रतिमा पूजनाने शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी ओम ग्रुपचे अध्यक्ष श्री. रवींद्र भोवड तसेच सचिव श्री. उमाशंकर (बाळ) दाते यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या हर्षदा राजापकर, संकेत शिंदे आणि अनिल यादव या कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर तपासणी शिबिराला सुरवात झाली. या शिबिराचा आडिवरे आणि कशेळी परिसरातील सुमारे ९४ नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिराला नाटे सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप काळे यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कोविड योद्धा म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप काळे यांचा सत्कार करण्यात आला. ओम ग्रुप चे अध्यक्ष श्री. रवींद्र भोवड यांनी पुष्प्गुच्छ, शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन श्री. काळे यांना सन्मानित केले. यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप काळे यांनी ओम ग्रुपच्या कार्याचा गौरव केला तसेच अशाप्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य देण्याचे आश्वासनही दिले. या वेळी त्यांनीही या शिबिराचा लाभ घेतला.

या प्रसंगी ओम गृप आडिवरे चे खजिनदार प्रसन्नचंद्र दाते, सदस्य स्वप्नील भिडे,पोलीस पाटील अतिष भोवड,वरद गोरे, भाई फणसे, प्रताप मुरकर, श्रीहर्ष आपटे आदि उपस्थित होते.



Comments