रत्नागिरी जिल्ह्याभरात राबविण्यात येणाऱ्या संगणक कौशल्य अभियानचे खासदार श्री.सुनील तटकरे यांच्या हस्ते गुहागर येथे डिजिटल अनावरण
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष साहिल आरेकर यांच्या संकल्पनेतून संगणक कौशल्य अभियान संपूर्ण रत्नागिरी जिल्हा मध्ये दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे संगणक ही काळाची गरज असून सद्या कोरोना संकट काळात आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना हातभार म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.
या संगणक कौशल्य अभियाना अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कोर्सेस करायचे आहेत त्याना सवलतीच्या दरात कोर्सेस उपलब्ध होणार असून उर्वरित फी चा भार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उचलणार आहे तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विविध शाखेत विद्यार्थी या अभियाना अंतर्गत कोर्सेस करू शकतात अधिक माहिती साठी प्रत्येक तालुक्यातील संपर्क नंबर प्रसारीत केले जाणार आहेत.
या अभियानाचे डिजिटल अनावरण खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते गुहागर येथे पार पडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव , माजी आमदार श्री.रमेश कदम, माजी आमदार श्री.संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर आरेकर, गुहागरचे नगराध्यक्ष श्री.राजेश बेंडल, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष श्री. योगेश शिर्के, दिशा इन्स्टिट्यूट गुहागर शाखा व्यवस्थापक श्री. ओंकार पटवर्धन , राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष श्री.गौरव वेल्हाळ, राष्ट्रवादी गुहागर शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, जिल्ह्य सचिव श्री.विजय मोहिते, श्री. जगदीश गडदे, माजी सभापती सौ.संपदा गडदे, नगरसेविक सौ.सुजाता बागकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष श्री. असीम साल्हे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष सौ.मृणाल विचारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री. प्रथमेश वेदरे ,श्री.सुकूमार बिर्जे , त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी , युवक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment