अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोकण बोर्डाच्या ई १२वी च्या परीक्षेत तसेच नुकत्याच घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. सदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहोळा महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्या विशाखा सकपाळ, पर्यवेक्षक श्री. अनिल उरुणकर, विज्ञान विभागाचे प्रमुख श्री. चिंतामणी दामले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी ‘विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चित करून आणि स्वत:वर विश्वास ठेऊनच अंतिम ध्येयापर्यंत पोहोचता येईल’, असे विधान केले. याप्रसंगी त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले. परीक्षेत विद्यार्थ्नांनी प्राप्त केलेल्या उत्तम यशाबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कोकण बोर्डाच्या इ. १२वी च्या परीक्षेत तसेच जेईई परीक्षेत यश प्राप्त केलेल्या आदित्य मगदूम, गायत्री जाधव, ईशा नवरे, तुषार पडये, आयुष धुळप, गौरी सुर्वे या विद्यार्थ्यांचा कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुलांशी संवाद साधताना कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांनी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व जेईई व नीट परीक्षेचे परीक्षापूर्व मार्गदर्शन संस्थेतर्फे करण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमात श्री. चिंतामणी दामले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रातिनिधिक स्वरूपात कु. गायत्री जाधव हिने आपले मनोगत व्यक्त केले; आपल्या यशात पालकांचा आणि शिक्षांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती विशाखा सकपाळ यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या भरीव यशाबाद्द्दल विद्यार्थ्यांचे, पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. रुणा नागवेकर यांनी तर आभारप्रदर्शन उपप्राचार्या श्रीमती विशाखा सकपाळ यांनी यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Post a Comment