रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणा-या जागांमध्ये लागणार आता मोठमोठे होर्डींग्ज
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेत उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने सभापती व सदस्य यांच्यासमवेत बैठक पार पडली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणा-या जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये होर्डींग्ज लावण्यासाठी विशेष मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १७४ ग्रामपंचायत आवारांमध्ये अथवा इमारतींमध्ये वर्क शेड आहेत त्या देखील बचत गट किंवा अन्य खाजगी व्यावसायिकांसाठी लिलाव पद्धतीवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी विभागाची जी गोदामे रिकामी आहेत ती गुदामे खाजगी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरिल रेस्ट हाऊस, निवासस्थाने यांचे पुनरुज्जीवन करुन भाडे तत्त्वावर कसे देता येतील याचा देखील विचार विनिमय सुरु आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी घेतलेल्या या निर्णयांमुळे सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment