आत्महत्येच्या विचारात असलेल्या हवाई सुंदरीचं शिक्षण घेणाऱ्या मुलीला पोलीसांनी वाचवलं
कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या हवाई सुंदरीचं शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला अंधेरी पोलिसांनी समयसूचकता दाखवून वाचवले.शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अंधेरी पो. ठाणे हद्दीतील अंधेरी (पुर्व ) येथील तिरुपती बालाजी इमारत या इमारतीचे गच्चीच्या पाण्याच्या टाकीवर चढून एक मुलगी खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर पोलीस मोबाईल व्हॅनसह बिट मार्शल पोलीस नाईक भिंगारदिवे, पोलीस नाईक थिटे, प्रविण जाधव यांनी घटनास्थळी पोहचले.
नम्रता दिवाकर पांडे, (वय २० वर्ष) नावाची मुलगी कौटुंबिक वादाचे कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या हेतूने चढली आहे, हे पोलिसांना समजले. पोलिसांनी समयसुचकता दाखवत नम्रताला चातुर्याने तिच्या मनाची समजूत घालत इमारतीचे खाली आणण्यात यश मिळवले. पोलीस घटना स्थळी वेळेवर पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.नम्रता ही अंधेरी कोलडोंगरी परिसरात राहते. हवाई सुंदरीचा कोर्स करते. तिची पुढील चौकशी अंधेरी पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पावडे यांनी दिली.

Comments
Post a Comment