‘चिपको-आंदोलन’मुळे वाचले अकोला-बार्शीटाकळी मार्गावरील शेकडो वृक्ष

 


अकोला ते बार्शीटाकळी ह्या रस्त्याच्या कडेला असलेली जवळपास १८०० जुने वृक्ष कत्तलीस सुरुवात झाली होती.रस्ता रुंदीकरण करण्याच्या नावावर ही मोठी वृक्षतोड होत असून त्या विरोधात  २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता पक्षाच्या वतीने वृक्ष बचाओ " चिपको आंदोलन " करण्यात आले.संबंधित अधिकारी, तहसिलदार तसेच ठाणेदार ह्यांनी नविन वृक्ष लागवडी शिवाय वृक्ष तोड करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने वंचितने आंदोलन मागे घेतले. ह्या वेळी जिल्हा, तालुका, सर्कल, ग्रामशाखा, महिला आघाडी, सम्यक, युवक पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी सकाळी ११ वाजता कान्हेरी सरप येथे मोठया संख्येने हजर होऊन झाडांना आलिंगन देत आंदोलन सुरू केले होते. 

दोन तासांनी शाखा अभियंता तहसीलदार गजानन हामंद, ठाणेदार तिरुपती राणे ह्यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच वंचितने मागणी केल्या प्रमाणे नवीन वृक्ष लागवड करूनच जुनी झाडे काढण्यात येतील असे शाखा अभियंता ह्यांनी स्पष्टपणे सांगून वृक्षतोड करणार नसल्याचे मान्य केले. त्यामुळे वंचित चे चिपको आंदोलन मागे घेण्यात आले.दिलेल्या आश्वासना प्रमाणे वागले नाही तर बांधकाम विभागाला घेराव घालू असा इशारा ह्या वेळी पदाधिकारी ह्यांनी दिला.

Comments