ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवावा; असीम कुमार गुप्ता यांचे निर्देश


राज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाइन द्वारे सुरू आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रात देखील वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी, आवश्यक कामे असल्याखेरीज विज यंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीज पुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री असीम कुमार गुप्ता यांनी दिले आहेत. राज्यात येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे शालेय वर्ग व परीक्षा तसेच इतर महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाइन द्वारे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरण कडून अखंडित वीज पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. 

तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात यावा अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय विजय यंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद ठेवू नये. देखभाल व दुरुस्तीचे काम अत्यंत आवश्यक असल्यास ऑनलाइन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावी. तत्पूर्वी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थांशी समन्वय व संवाद साधून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे व त्यासंबंधीची माहिती एस एम एस द्वारे संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी असेही निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री असीम कुमार गुप्ता यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत

Comments