नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे विमा कंपन्यांची पाठ
या वर्षीच्या खरिप हंगामात भात उत्पादक शेतकऱ्यांनी काही खासगी विमा कंपन्यांकडून पिकाचा विमा काढलेला आहे. तर विविध सेवा संस्थांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा कर्ज देणाऱ्या संस्थांनी काढलेला आहे. परतीच्या पावसाने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या कंपन्यांकडे धाव घेतली आहे. मात्र, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तर सेवा सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
वाडा तालुक्यात जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त अनेक शेतकऱ्यांनी भातपिकाचा विमा खासगी विमा कंपन्यांकडे हेक्टरी एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत रक्कम भरून विमा काढलेला आहे. तर पालघर जिल्ह्य़ातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत असलेल्या सेवा सहकारी संस्थांमधून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा एचडीएचएफसी एरगो इन्शुरन्स कंपनी लि. कोरेगाव पार्क, पुणे या कंपनीकडे रक्कम भरून विमा घेतलेला आहे.
गेल्या आठवडय़ात झालेल्या परतीच्या पावसाच्या तडाख्याने भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी विमा घेतलेल्या खासगी कंपन्यांकडे वारंवार कंपनीने दिलेल्या मोफत संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी बोलणे टाळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
कंपन्यांनी दिलेले मोफत संपर्क क्रमांक सतत व्यग्र असल्याचे सांगून कुठल्याही प्रकारचा संवाद न होता, आपण संवाद साधाल्याबद्दल धन्यवाद, असे संदेश द्यायलाही या कंपन्या विसरलेल्या नाहीत.
गेले चार दिवस सातत्याने संपर्क करूनही विमा कंपन्यांचे मोफत संपर्क क्रमांक व्यग्र असल्याचे कमलाकर पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करणाऱ्या या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्हा बॅंकेची फसवणूक
ल्ल ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत असलेल्या पालघर जिल्‘ातील दिडशेहुन अधिक सेवा सहकारी संस्थांनी पीक कर्ज घेतलेल्या ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा एचडीएचएफसी एरगो इन्शुरन्स कंपनी पुणे या कंपनीकडून पीकविमा घेतलेला आहे. या कंपनीकडे पालघर जिल्‘ातील ३० हजाराहून अधिक शेतकऱ्यांची खरिप हंगामातील भातपीकाच्या विम्याचे तीन कोटीहुन अधिक रक्कम भरणा केलेली आहे.
ल्ल या कंपनीने सहकारी संस्थांना दिलेले पुणे कार्यालयातील सर्व (तीन संपर्क क्रमांक) संपर्क दुरध्वनी क्रमांक हे चुकीचे दिलेले असल्याने शेतकऱ्यांची पर्यायी पीक कर्ज देणाऱ्या संस्थांचीही फसवणूक या कंपनीने केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वारंवार संपर्क करूनही ‘आपण संपर्क करीत असलेला क्रमांक चुकीचा असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Post a Comment