महिला पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले आत्महत्या करणा-या इसमाचे प्राण
रत्नागिरीतील महिला पोलिस कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून जाळुन घेण्याचा प्रयत्न करणा-या इसमाचे प्राण वाचवले आहेत. हा थरारक प्रकार गुरुवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
रत्नागिरीतील गवळीवाडा येथील शैलेश सुधाकर सुर्वे या व्यक्तीने जमिनीच्या प्रकरणातून शासनाकडून योग्य न्याय मिळत नसल्याने कारभाराला कंटाळून गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून जाळुन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल लतिका मोरे यांनी त्या ठिकाणी शैलेश सुधाकर सुर्वे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना पाहिले. त्यावेळी त्यांनी तात्काळ सुर्वे यांच्या हातातील रॉकेलचा कॅन हिसकावून घेतला. व त्याचे प्राण वाचवले.
याबाबत तात्काळ शैलेश सुधाकर सुर्वे याना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली असल्याची माहीती शहर पोलिस निरिक्षक अनिल लाड यांनी दिली आहे.




Comments
Post a Comment