शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु, कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा -शौकत मुकादम

 


कोकणामध्ये भात शेतीचे पिक हे महत्वाचे आहे . लहानात लहान शेतकरी भात शेतीवर अवलंबून असतो . परतीचा पाऊस पडत असल्यामुळे लहान मोठे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.तरी महाराष्ट्र शासनाने कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा.अशी मागणी कोकण अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम  यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे . 

कोकणामध्ये भाताच्या पिकाबरोबर नाचणी,वरी तांदुळ अशी अनेक पिकांची नुकसान परतीच्या पावसामुळे झाल्याने शासन कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत मिळवी अशी मागणी शौकत मुकादम शासन दरबारी केली आहे.भात शेतीचं नुकसान पाहणी करताना शौकत मुकादम, राजू जाधव,जुनेद परकार व अन्य दिसत आहेत.

Comments