सोशल मीडियावर सनी लिओनीच्या बाथटब फोटोंची चर्चा!

 


अभिनेत्री सनी लिऑन (Sunny Leone) या ना त्या कारणाने सतत चर्चेत येत असते. आताही सनीने एका हॉट फोटो शूट केलं आहे. हे फोटोज् सनीने सोशल मीडियावर शेअर केले आणि काही वेळातच सनीच्या फोटोंना लाखोंवर लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

हे फोटो शेअर करत असतानाच सनीने एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. आपण अनेक महिने घरीच आहोत. इतके दिवस घरी राहणं आपल्या सगळ्यांसाठी कठीण आहे पण परिस्थितीमध्ये हळूहळू बदल होईल आणि सगळं पूर्ववत होईल असं म्हणत सकारात्मक राहण्याचा सल्लाही सनीने दिला आहे.

सनीच्या या फोटोशूटमध्ये ती एका बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. तसंच तिने आकर्षक अशी गुलाबी रंगाची लिपस्टिकही लावली आहे.सनी लिऑनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच शेअर होत आहेत. सनी नेहमीच आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सनी लिऑन सध्या बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात सनी बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.सोशल मीडियावर सनी चांगलीच अॅक्टिव्ह असते. सनीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सनीच्या या फोटोंवर कमेंट्सचा नुसता पाऊस पडला आहे.

Comments