रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना रत्नागिरी तालुका आरोग्य विभागाच्यावतीने शुभेच्छा
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ. संघमित्रा फुले यांची नियुक्ती झाल्यानंतर रत्नागिरी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. संघमित्रा फुले यांचे रत्नागिरी तालुका आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सतत मार्गदर्शन लाभत असते. या पार्श्वभूमीवरच रत्नागिरी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी डॉ.शितल सुर्यवंशी, के.एन.बिराजदार-विस्तार अधिकारी, अमित कोरगावकर-कनिष्ठ सहाय्यक, रोहिणी किड्ये-तालुका अकाऊंटंट, रुपाली पोळेकर-आरोग्य सेविका, जाई निवेकर-तालुका कार्यक्रम सहाय्यक, अमर विचारे-तालुका समूह संघटक, मंगल ठिक- आरोग्य सेविका, प्रदिप महाकाळ-परिचर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment