श्री महाकाली देवस्थानने जपली सामाजिक बांधिलकी:रक्तदान शिबीराचे आयोजन


कोरोनो महामारीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव उत्सव सार्वजनिक स्वरूपात होऊ शकत नसल्याने सामाजिक उपक्रम म्हणून श्री महाकाली देवस्थान आडिवरे यांनी 18 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

शासकीय रुग्णालयात रक्ताचा पुरवठा खुप कमी आहे,परिसरात महिन्यापूर्वी रक्तदान शिबीर घेण्यात आले होते ,तरी ही सामाजिक गरज लक्षात घेऊन देवस्थानने सामाजिक बांधीलकी जपत 42 रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी शासकीय रुग्णालयाच्या सौ.सावंत मॅडम व स्टाफ ,ओम ग्रुप चे रवींद्र भोवड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश डुकळे उपस्थीत होते.

 शिबिर यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे सर्व ट्रस्टी तसेच प्रसाद शेट्ये,संजय (पप्पू )गुरव,स्वप्नील भिडे,प्रसाद नाईक यांनी विशेष मेहनत घेतली

Comments