रस्त्याच्या दुर्देशेस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी -भरत लब्ध्ये


शिरगाव -मुबंई -गोवा महामार्ग व गुहागर -विजापूर मार्ग अनेक ठिकाणी रस्त्याचे चाळण झाले असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे दुचाकी व चारचाकी गाड्याचे अपघात झाले आहेत त्यामुळे रस्त्याच्या दुर्दैश जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी इ कॉग्रेस माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध्ये यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गुहागर विजापूर महामार्ग दरम्यान चिपळूण ते पिंपळी बुद्रुक या सुमारे 10 किलो मिटर रस्त्याचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीने केले आहे एप्रिल 20 मध्ये बांधकाम विभाग व महामार्ग विभागात लब्ध्ये यांनी बेठक घेतली होती आणि पावसाळ्यापूर्वी जोडरस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या गेल्या होत्या परंतु 15 जून नंतर भर पावसात काम केल्यामुळे खेर्डी,पेंढाबे, पिंपळी बुद्रुक येथे मोठं मोठे खड्डे पडले आहेत. कुंभार्ली घाटातील विशेष दुरुस्तीचे सुमारे 4 किलोमीटर मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी वर्क ऑर्डर मिळून सुद्धा केलेले नाही.

 कुंभार्ली घाटातील खड्ड्यामुळे वाहने सरळ दरीत जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपयांची कामे असल्यामुळे अधिकारी वर्ग यांना लाखो रुपयांत टक्केवारी मिळते याचा परिणाम म्हणून अधिकाऱ्यांच्या तोंडाला आपोआप कुलूप लागते व सर्वसामान्य यांचा नाहक जीव जातो ठेकेदार व अधिकारी यांच्या बेजबाबदारपनामुळे सर्व सामान्य यांची ससेहोलपट होत असून सर्व सामान्य यांचा नाहक जीव जात आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी इ कॉ माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध्ये यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाच्यामाध्यमातून केली आहे.

Comments