ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुस्लिम बांधवाना रत्नागिरी पोलीसांकडून आवाहन
दि.३०/१२/२०२० रोजी साजरा होणा-या ईद-ए-मिलाद सणाकरीता रत्नागिरी जिल्हयातील मुस्लिम बांधवाना पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले आहे की, राज्यात कोरोना-१९ विषाणुची साथ चालु आहे. त्याच बरोबर अनलॉकची प्रक्रिया देखील सुरु आहे. त्या अनुषंगाने दि.३०/१२/२०२० रोजी साजरा होणा-या ईद-ए-मिलाद सण राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरा करावा. सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, नागरिकांनी कोव्हीड-१९ च्या परिस्थितीचा विचार करुन रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, आयोजित करावे. कोविड -१९ च्या अनुषंगाने शारिरीक अंतर ठेवणे, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर करावा. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सर्व नागरिकांनी या सणात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेवून श्रध्देसोबतच सुरक्षिततेकडे लक्ष देवून सण साजरा करावा.कोविड १९ विषाणुच्या अनुषंगाने वरील दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुनदिनांक ३०/१०/२०२० रोजी होणा-या ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पाडावा असे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आवाहन करुन सर्व मुस्लिम बांधवाना ईद-ए-मिलाद सणाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Comments
Post a Comment