गावखडी गावातील विजेचे खांब व तांरांच्या आजुबाजुला असलेली झाडी-झुडपे यांची ग्रामस्थांनी केली साफसफाई

 


गावखडी भंडारवाडीमध्ये लाईट गेलेली दिसून येत असताना संबंधित खात्यात फोन करता वायरमन तसेच त्यांचे वरिष्ठ या कोणाचाही कॉन्टॅक्ट होत नाही आहे. हे ज्यावेळी श्री रामेश्वर ग्रुपचे सदस्य संतोष तोडणकर, सुनील मुडे आणि निनाद पाटील यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी स्वतः लाईनवर जाऊन पाहणी केली असता दोन ठिकाणी  एल.टी. लाईन नादुरुस्त असल्याचे दिसून आले. 

यावेळी रामेश्वर ग्रुपचे सदस्य संतोष तोडणकर आणि सुनील मुडे यांनी स्वतः नादुरुस्त लाईनची साफसफाई आणि झाडेझुडपे साफ केली आणि गावकऱ्यांना पुन्हा एकदा लाईट उपलब्ध करून दिला. संतोष तोडणकर आणि सुनील मुडे यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून धन्यवाद मानण्यात येत आहेत.

Comments