अजित यशवंतराव यांना विधान परिषदेवर संधी द्यावी

 


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते अजित यशवंतराव यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद नियुक्ती साठी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी राजापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष, जैतापूर येथील राष्ट्रवादी कार्यकर्ते सर्फराज काझी यांनी केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात शेखर निकम सोडून अन्य एकही आमदार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अधिकाधीक ताकद मिळणे आवश्यक आहे. 

मागिल पाच वर्षात अजित यशवंतराव यांनी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना बळकटी देण्याचे काम केले. ग्रामिण भागातील लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळे अजित यशवंतराव यांना विधान परिषदेत संधी मिळावी अशी मागणी कार्यकर्ता या नात्याने सर्फराज काझी यांनी केली आहे.

Comments