महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचाराच्या प्रश्नांसदर्भात असंवेदनशील



महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अति गंभीर होत चाललेला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सूत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. 

भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबियांना,स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल  निवेदन पाठविले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधविधायक प्रतिसाद देण्याची शिष्ठाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते.

या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही. वरील सर्व वस्तुस्थिती ही खरी असून त्याचाच एक भाग म्हणून व झोपी गेलेल्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जाग आणण्यासाठी  रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरीचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सौ.ऐश्वर्याताई जठार-महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, सौ.शिल्पा मराठे-जिल्हा सरचिटणीस, सौ. राजश्री शिवलकर-शहराध्यक्ष, सौ. तनया शिवलकर-तालुकाध्यक्ष, सौ. मानसी करमरकर-नगरसेविका, सौ संपदा तळेकर-उपाध्यक्ष, सौ.प्राजक्ता रूमडे-ओ.बी.सी संघटक आदी उपस्थीत होते.

Comments