राहूल गांधींवर धक्काबुक्की हे निषेधार्हच आहे


उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित मुलीवर अत्याचार होतो. त्यानंतर तीचे ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार होतात ती बाब निषेधार्हच आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी कॉंग्रेस नेते खासदार राहूल गांधी तिथे गेले असता त्यांच्यावर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. ही बाब निषेधार्हच आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे या घटनेच्या बाबतीत उत्तर प्रदेश सरकारचे कृत्य हे मानवतेला कलंक लावणारे आहे. त्यामुळे संपुर्ण देश अशा शासनकर्त्यांचा निषेधच करणार अशी सडकून टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

Comments