सती चिंचघरी प्राथमिक विदयालयात ऑनलाईन अभ्यासासोबत ऑनलाईन ग्रुप डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न

 


सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती ) ता.चिपळूण हे प्राथमिक विदयालय उपक्रमशील विदयालय आहे.कोरोना महामारीमुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत, मात्र शिक्षण उत्तम प्रकारे सुरू आहे. शाळेने मार्चपासूनच ऑनलाईन शिक्षणाला सुरवात केली आहे . ऑनलाईन अभ्यासासोबत शिक्षक नियमितपणे विविध ऑनलाईन उपक्रम घेवून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात गुंतवून ठेवत आहेत .पालक देखील याला उत्तम सहकार्य करत आहेत . 

नुकतीच 2 री वर्गाच्या शिक्षिका सौ .मनिषा कांबळी , सौ .विनया नटे , सौ . अनिता पाटील यांनी मुख्याध्यापक श्री .अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन ग्रुप डान्स स्पर्धा घेतली . बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले  होते .विद्यार्थ्यांनी घरच्या घरी उपलब्ध साधनांचा उपयोग करून ताई -दादा , आई - वडील , मित्र - मैत्रिणी यांच्या सोबत ग्रुप डान्स सादर करून त्याचा व्हिडीओ शाळेकडे पाठविला. 

यामध्ये देवा श्रीगणेशा ... , चंद्रभागेच्या तिरी गं .. . चॅक धुमधुम .... , सहयाद्रि थिम साँग .... टिपरी नृत्य ... कोळी नृत्य .. लावणी ... असे वैशिष्टयपूर्ण ग्रुप डान्स सादर केले . स्पर्धेपूर्वी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार स्पर्धेत संस्कार गटात प्रथम कु . अर्णव संजय इचले , द्वितीय मनस्वी संतोष चव्हाण , तृतीय कु . स्वरा समीर भाताडे व कु . गायत्री दिलीप भुरण अविष्कार गटात प्रथम कु . मृणाई विनोद महाडीक , द्वितीय कु . सायली शैलेश मोहिते तृतीय कु .पूर्णा वैभव दाभोळे व अंकुर गटात प्रथम कु . शुभम समीर बेर्डे , द्वितीय कु . वेदांत सचिन वलावंडे, तृतीय कु . वेदांगी योगेश खेतले व कु . गुलबसा अकबरअली शहा यांनी यश प्राप्त केले.

Comments