रत्नागिरी जिल्ह्यातील तारतंत्री कर्मचा-यांनी सुरक्षा साधनांचा वापर न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

विजेच्या खांबांवर काम करत असताना नुकतेच रत्नागिरीतील एका तारतंत्री विज कर्मचा-याचा अपघात झाला होता. मात्र या अपघातात त्याचे प्राण वाचले. कारण त्या कर्मचा-याने सुरक्षा साधनांचा वापर केला होता. आता तो कर्मचारी कोल्हापूर येथे उपचार घेत आहे. मात्र अनेक कर्मचारी विद्युत पोलांवर काम करत असताना विद्युत सुरक्षा साधनांचा वापर करत नाहित. रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरणच्या तारतांत्रि कर्मचा-यांनी विद्यूत पोलांवर काम करत असताना सर्व सुरक्षा साधनांचा वापर करावा. जे कर्मचारी सुरक्षा साधनांचा वाअर करणार नाहित त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहीती रत्नागिरी महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रिवादळादरम्यान दापोली, मंडणगड या भागात विजेच्या तारा, विजेचे खांब कोसळले होते. ते काम शंभर टक्के पुर्ण झाले असून विद्युत पुरवठा सुरळीत आहे. वाढीव विजबिलांच्या संदर्भात महावितरण कंपनिकडून वेळेत उपाययोजना करण्यात येत आहेत. थकित विज ग्राहकांनी विज बिले तात्काळ भरण्यात यावीत. जेणे करुन महावितरण कंपनीचे नुकसान होणार नाही. फॉल्टी मिटरच्या बाबतीत ज्या ग्राहकांचे मिटर फॉल्टी आहेत त्यांनी लेखी तक्रारी तालुका कार्यलयात द्यायच्या आहेत. त्यानंतर मिटर दुरुस्ती किंवा मिटर बदलण्यात येतील. अशी माहीती मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली.

नुकतेच जिल्ह्यात विज मिटर वरुन रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे जे प्रतिनिधी मिटर रिडिंग घेण्यासाठी जातात ते मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करत आहेत. या प्रतिनिधींना सर्व विज ग्राहकांनी विज मिटर रिडिंग घेताना सहकार्य करावे असेही आवाहन मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आहे.

Comments