ओवैसीसारखे काही नेते अजूनही आगीत तेल ओतून हिंदू व मुस्लिमांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत
देशातील मुस्लिम धर्मीयांचाही अयोध्येतील राममंदिरास विरोध राहिलेला नाही. मात्र बाबरी पतनाच्या खटल्यातून हिंदू नेत्यांना निर्दोष सोडल्यामुळे ओवैसीसारखे काही नेते अजूनही आगीत तेल ओतून हिंदू व मुस्लिमांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने याबाबत निकाल दिला. या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत करायला हवं, असं मत शिवसेनेनं सामना संपादकीयमधून व्यक्त केलं आहे.उगाच जुनी थडगी उकरून माहोल खराब करण्यापेक्षा बाबरी प्रकरण फाइलबंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालाचे सर्वांनीच स्वागत करायला हवे.

Comments
Post a Comment