शौकत मुकादम यांच्या मागणीला यश



चिपळूणमध्ये कोरोनाने हाहाकार उडवला होता.त्यामुळे सर्प आणि विंचू दंश हे प्रकार सर्रास येथे घडतात त्याची दखल घेत माजी सभापती शौकत मुकादम यांनी कामथे रुग्णालयातील ओपीडीमध्ये दंश पीडित रूग्णावर उपचार करण्याची मागणी केली होती मंगळवारी खासदार सुनील तटकरे,आमदार भास्कर जाधव,आमदार शेखर निकम हे एका कार्यक्रमासाठी कामथे रुग्णालयात आले होते . 

त्यावेली मुकादम यांनी हा विषय उपस्थित केला.त्याची दखल देखील सर्व नेत्यांनी घेतली रुग्णालय प्रशासनाशी तात्काळ चर्चा करून सर्प आणि विंचू दंश रुग्णावर उपचार सुरू करण्याच्या सूचना देखील दिल्या रूग्णालय प्रशासनाने देखील त्याला मान्यता दिली आहे .त्यामुळे आता सर्प , विंचू दंशवर कामथे रूग्णालयात उपचार सुरू करण्यात येणार आहे.


Comments