सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात पालकांसाठी सलाड डेकोरेशन व स्टोन पेन्टींग उपक्रम उत्साहात संपन्न
सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी - चिंचघरी (सती ) ता.चिपळूण हे प्राथमिक विद्यालय उपक्रमशील विद्यालय आहे. कोरोना महामारीमुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत, मात्र ऑनलाईन शिक्षण उत्तमप्रकारे सुरु आहे. शाळेने मार्च पासूनच ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली आहे. ऑनलाईन अभ्यासासोबत शिक्षक नियतमितपणे विविध ऑनलाईन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात गुंतवून ठेवत आहे. पालक देखील याला उत्तम सहकार्य करीत आहेत.
इयत्ता ४ थी च्या शिक्षिका श्रीम. वृषाली राणे व सौ . अपूर्वा शिंदे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 4 थी च्या पालकांसाठी विशेष आकर्षक सलाड डेकोरेशन व स्टोन पेन्टींग हे उपक्रम घेतले . या उपक्रमांना पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमामधून विविध पक्षी, फुलाची डिझाइन, फुलपाखरू, गणपतीची प्रतिमा, गळ्यातील हार, बेटी बचाओ असे संदेश देण्यात आले
उपक्रमामध्ये सौ.ऋतुजा सावंत, सौ.शिवानी सुर्वे, सौ.गुलनार संदे, सौ. प्रार्थना जठार, सौ.भारती भुरण, सौ.प्रणिता जाबरे, सौ. आदिती चव्हाण, सौ.अमृता माने, सौ.सृष्टी दवंडे, सौ.श्रावणी सागवेकर, सौ.पल्लवी तांदळे , सौ.संपदा विरकर,सौ.श्रध्दा पाटील , सौ.श्रेया मोडक, श्रीम. प्रतिभा शिंदे , सौ.मानसी बडद, सौ.मानसी गुजर, सौ.स्वाती जाडकर, सौ. पूर्वा जोग, सौ.श्रावणी जागडे , सौ.सुजाता पारवे यांनी सहभाग घेतला तर स्टोन पेन्टींग मध्ये सह्याद्रि शिक्षण संस्थेचा लोगो, फळांची चित्रे, निसर्ग चित्र, फुलांची चित्रे, पक्षांची चित्रे यांचे पेन्टींग करण्यात आले.
उपक्रमात सौ. आदिती चव्हाण, सौ. श्रद्धा रेवाळे, सौ. शिवानी सुर्वे , सौ. मानसी दाते , सौ.भारती भुरण सौ. वेदिका शिर्के , सौ. पूर्वा जोग यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनाही उपक्रमात सहभागी होता आले,त्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments
Post a Comment