रत्नागिरी जिल्हा एम.पी.एस.सी. परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवावी तेली आळी येथील ओबिसी संघर्ष समन्वय समितीची मागणी

 


रत्नागिरी जिल्ह्यात एम.पी.एस.सी. परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी शहरातील तेली आळी येथील ओबिसी संघर्ष समन्वय समितीने रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी एम.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षा होणार आहेत. 

सदर दिवशी काही संस्था, काही संघटना, हरताळ किंवा विद्यार्थ्याना परिक्षेला बसण्यापासून प्रतिबंधीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे परिक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवणे आवश्यक असल्याचे मत तेली आळी येथील ओबिसी संघर्ष समन्वय समितीने व्यक्त केले आहे.

Comments