मैत्री फाऊंडेशन कडून घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे निकाल घोषित
कोरोनाच्या सुरवातीच्या गंभीर प्रभावात 'मैत्री फाऊंडेशन साटवली पंचक्रोशी' संस्थेने जाहिर केलेल्या पंचक्रोशी मर्यादित निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. नैराश्य, नकारात्मकता, शारीरिक बौद्धिक मरगळ,उदासीनता झटकत अनेक विद्यार्थ्यांनी तसेच खुल्या गटातून पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत हा शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग दाखवला. प्रथमतः सर्वच स्पर्धकांचे संस्थेकडून मनःपूर्वक अभिनंदन, आभार व्यक्य करण्यात आले.
सामाजिक विषयांवरील निबंधात अभ्यासू अन सुवाच्य अक्षरातील निबंधांनी प्रभावित केले. चित्रकलेने तर खरोखरच भुरळ घातली. पंचक्रोशीतील हे कलाविष्कारी संस्कार निश्चितच पुढील भविष्यात सोनेरी किरणं आणतील याची आशा वाटते. हीच आशा प्रेरणादायी उपक्रमांनी तेवत ठेवत पुढे चालुया... कोरोनासारख्या सर्वच संकटांना नेटाने सामोरे जाऊया..पण त्या आधी स्पर्धेत नंबर मिळवत विशेष प्राविण्य दाखवलेल्या विजेत्यांचे अन् सहभागी झालेल्या सर्वांचेच अभिनंदन केले.
विजेते खालील प्रमाणे चित्रकला स्पर्धात इयत्ता-पहिली ते दुसरी-
पहिली ते दुसरी-१)आरुष प्रमोद डोंगरकर,२)सृष्टी प्रमोद मोरे३)अन्वी सुनील सावंत तर इयत्ता-तिसरी ते चौथी या गटात १)दर्शन राजेश डोंगरकर २)सुयश दिलीप सरवंदे ३)केतन प्रशांत जोंधळे आणि इयत्ता- पाचवी ते सातवीत १)तनिष्का सुनील सावंत २)साईशा विकास पराडकर ३)सत्यम संजय नरसले त्याचप्रमाणे इयत्ता-आठवी ते दहावी या गटात १)वैदेही उमाजी जोंधळे २)सागर प्रवीण वीर ३)समीक्षा सुनील सावंत याशिवाय इयत्ता- अकरावी ते बारावीत १)यदुप्रिया संजय नरसले २)श्रावणी संतोष मोरे ३)शुभम सूर्यकांत पराडकर आणि खुला गट विजेते१)दीपक अनंत तरळ२)सागर प्रकाश बंडबे३)सौ.आरोही रोहित आंब्रे यांचा समावेश आहे.निबंध स्पर्धा विजेते इयत्ता-पाचवी ते सातवी-१)सत्यम संजय नरसले२)वेदांत राजेंद्र सरवंदे३)सान्वी राजन सुर्वे तर इयत्ता आठवी ते बारावी१)(विभागून)यदुप्रिया संजय नरसले,पृथ्वी प्रमोद मोरे२)रुणाली गुरुनाथ डांबरे३)रोहित रमेश सुर्वे आणि खुला गट विजेते १)श्री श्याम गणपत बापेरकर२)श्री संजय दत्तू नरसले३)मिलिंद गंगाराम पड्यार यांचा समावेश आहे.सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त कराण्यात आले असून कोरोना संपताच लवकरच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल असे मैत्री फाऊंडेशन साटवली पंचक्रोशी यांनी जाहीर केले आहे.

Comments
Post a Comment