संगमेश्वर तालुका पारंपारिक लोक कलाविकास मंचाची स्थापना

 


संगमेश्वर तालुक्यातील नमन, जाकडी नृत्य सादर करणाऱ्या पारंपारिक लोककलाकारांना एकञ आणण्यासाठी प्रवीण टक्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुका पारंपारिक लोक कलाविकास मंच, महाराष्र्ट राज्य या नावाने लोककलाकारां साठी ही मंडळी काम पहाणार आहेत. नमन, जाकडीमधून फार पूर्वीपासून मनोरंजनातून समाजप्रबोधन करण्यात आले आहे. समाजातील चालीरिती, रूढी, परंपरा यांना लोककलाकारांनी जागते ठेवलेआहे. 

ग्रामीण भागात त्या काळात वीज नव्हती तरी पेट्रोमॅक्सवर हे प्रयोग होत होते. आज आधुनिक युगात जसे बदल होत गेले, तसेच बदल नमन व जाकडीतही झाले. माञ या लोककलाकारांना शासन दरबारी स्थान मिळाले नाही, ते स्थान मिळणे गरजेचे बनले आहे. नमन व जाकडीतून विविध मंडळे सीझनला बरेच प्रयोग करुन पुंजी जमवत असतात. आर्थिक गणिते चांगली जुळली तरी या कलाकारांना वृध्दपकाळात आर्थिक विंवचनेला सामोरे जावे लागते. यासाठी शासनाने या कलाकारांना मदतीचा हात देणे गरजेचे वाटते. 

संगमेश्वर तालुक्यातील लोक कलाकारांसाठी प्रवीण टक्के, प्रदिप भालेकर, नितीन बांडागळे, शेखर पांचाळ, पांडुरंग कदम, मनोहर सुकम, युयुत्सु आर्ते, आनंद बोंद्रे, कृष्णा जोगळे, किशोर चांदे, यशवंत गोपाळ,  तात्या लाड, अशोक बेंद्रे, अशोक पांचाळ, दीपक शिवगण हे काम पहाणार आहेत.

Comments