मोठया प्रमाणात झालेल्या भातशेती नुकसानीमुळे कोकणा मध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार



राजापूर/प्रतिनिधी दि.२० काही दिवसांपूर्वी कोंकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या भातशेतीचे नुकसान झाले असून त्याचे सरसकट पंचनामे व्हावे ,पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला पंचयादी करून त्या शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळावी,ओला दुष्काळ जाहीर करावा , कोंकणामध्ये मे महिन्यापासून आजतागायत अव्यहतपणे झालेल्या अतिवृष्टीमुळे कोंकणातिल शेतकर्‍यांची भात कापणीला आलेले पीक खराब झाले असून सदर पिकावर कीड पडल्यामुळे शेतकर्‍यांच्या भातशेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले त्यावेळी आमदार डॉ.राजन साळवी यांनी  मा.कृषिमंत्री ना.दादा भुसे मंत्री यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी मा.कृषिमंत्री ना.दादा भुसे मंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक निर्णय होणेच्या अनुषंगाने आश्वासन दिले.

त्यानुषंगाने आज आमदार डॉ.राजन साळवी यांनी गटविकास अधिकारी सागर पाटील,तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील मॅडम यांचे समवेत  राजापूर तालुक्यात दौरा केला असता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे व्हावे ,शेत कसणाऱ्याला लाभ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार महोदयांकडे केली.

परतीच्या पावसाने संपूर्ण राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनचे भात, नाचणी,वरी ,भुईमूग इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता आमदार डॉ.राजन साळवी यांनी शेतकऱ्यांना या परिस्थितीतुन सावरण्याकरता शेतीच्या नुकसानीचे सरसकट तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे .काही शेतकऱ्यांनी  नुकसान झालेली भातशेतीची कापणी लगेच केली आहे त्यामुळे पंचनामा करताना त्याचा पण विचार होणे आवश्यक आहे.

तसेच  कोरोना  संक्रमनाणे होरपळलेल्या  बळीराजाला परतीच्या पावसाने दिलेला दणका हा फारच जोराचा असल्याने यातून सावरण्याकरता या शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होऊन मर्यादित कालावधीत त्याची शाश्वत भरपाई मिळण्यासाठी जलदगतीने कार्यवाही व्हावी असे आदेश संबधित अधिकार्‍याला दिले तसेच कोंकणामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीबाबत कोकणा मध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार असल्याचे सांगितले.

त्यावेळी राजापूर पंचायत समिती सभापती प्रकाश गुरव,गटविकास अधिकारी सागर पाटील,तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील मॅडम,उपतालुका प्रमुख तात्या सरवणकर,,विभाग प्रमुख संतोष हातनकर,पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव,मंडळ कृषी अधिकारी कांदळे, सरपंच चिखलगाव योगेश नकाशे,उपसरपंच कृष्णा नाग्रेकर शीळ दै.सकाळ प्रतिनिधी राजेंद्र बाईत,ग्रामपंचायत सदस्य राजाराम दळवी,प्रकाश भोवड,विजय हातनकर, प्रसाद हातनकर, दीपक हातनकर, संतोष लोळगे,रुपेश हातनकर, तलाठी माया गमरे,कृषी सहायक दशरथ शिंदे ,ग्रामसेवक अहिर मॅडम,ग्रा प कर्मचारी सुनील हातनकर व अन्य शेतकरी उपस्थित होते

Comments