वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची रायगड येथे बदली
जिल्ह्यात पोलीस दलातील अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलणारे व प्रचंड दांडगा जनसंपर्क असणारे जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची रायगड येथे बदली झाली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाला आयएसओ मानांकन मिळवून देणे, वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून वाहतुकीला शिस्त लावणे, वरिष्ठांनी दिलेली कोणतीही जबाबदारी सुयोग्य नियोजन करीत पूर्णत्वास नेणे आदी कार्यात अनिल विभूते यांचे योगदान होते. शहर वाहतूक शाखेचे सुसज्ज कार्यालय देखील त्यांनी उभे केले. प्रत्येक कार्याला 'विभूते' टच देऊन एक वेगळी ओळख त्यांनी जिल्हाभरात निर्माण केली होती. आता त्यांच्या रायगड बदलीचे आदेश आले आहेत.

Comments
Post a Comment