लोक कलावंतांनी घेतली आ.भास्कर जाधव यांची भेट


गुहागर मतदारसंघातील आंबडस येथील लोककलावंतांनी आज आमदार श्री. भास्करराव जाधव यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांबाबत चर्चा केली. याबाबत विधानसभेत आणि सरकारकडे पाठपुरावा करून आपल्यासारख्या सर्वच कलावंतांना न्याय मिळवून देईन, अशी ग्वाही आ. श्री. जाधव यांनी दिली. त्याचवेळी आपण मंत्री असताना राज्याच्या इमारत बांधकाम कामगार मंडळात आपल्याकडील सुतार, गवंडी, प्लास्टर, पुठ्ठी, रंगकाम करणाऱ्यांपासून बांधकामावर पाणी घालणाऱ्यांपर्यंत अनेकांचा समावेश करून ठेवला आहे.

शेती व फळबागांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांमध्ये  वानर, डुक्कर तसेच वटवाघूळ आदींचा समावेश करून घेतला आहे. यापासून झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा आपणास मिळू शकते. आशा प्रकारचे घेतलेले अनेक निर्णय आणि करून ठेवलेल्या तरतुदी याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे अवाहनदेखील त्यांनी केले.

Comments